मुरलीधर शिंगोटे यांना महात्मा फुले पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुरलीधर शिंगोटे यांना महात्मा फुले पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार

Share This
अहमदनगर : प्रसारमाध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या माध्यमकर्मींना गेल्या ८ वर्षांपासून इन्स्टिट्यूट फॉर मीडिया रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट (आयएमआरडी) व पत्रकारिता प्रशिक्षणातील टेक्नो र्जनालिस्ट या संस्थेच्या वतीने महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार दिला जातो. यंदाच्या सत्कारमूर्तींची घोषणा पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मनपाचे माजी महापौर संग्राम जगताप व संस्थाध्यक्ष प्रा. जयंत डी. गायकवाड यांनी जाहीर केली. या वर्षीचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार दै. 'पुण्य नगरी' समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता शिंगोटे यांना जाहीर झाला आहे. 

म. फुले राज्यस्तरीय पत्रकारिता गौरव पुरस्कारार्थींची इतर नावे अशी - संदीप भारंबे, शेख मोहम्मद अब्दुल कादीर, विजयसिंह होलम, पंकज इंगोले, लक्ष्मण राऊत, अभय दिवाण, मनोज गडनीस. म. फुले विशेष पत्रकारिता गौरव पुरस्कार - कैलास ढोले, ज्ञानेश दुधाडे, पुरुषोत्तम सांगळे, रणजितसिंग राजपूत, सुदर्शन सुर्वे, राजेभाऊ मोगल, युवराज जाधव, प्रा. अश्‍विनी कांबळे.

म. फुले जिल्हास्तरीय पत्रकारिता गौरव पुरस्कार - लहू दळवी, संजय शिवलेकर, मकरंद घोडके, सुनील नवले, गायत्री म्हस्के, चंद्रकांत वाक्चौरे, लव शिंदे, मिठूलाल नवलाखा, बाबा ढाकणे यांना प्रदान केला जाणार आहे. नगर शहरातील मार्केट यार्डजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास या सभागृहात २४ एप्रिल रोजी दुपारी २.00 वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages