मनपाच्या विशेष समिती अध्यक्षपदावर युतीचा झेंडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनपाच्या विशेष समिती अध्यक्षपदावर युतीचा झेंडा

Share This
मुंबई : मुंबई मनपाच्या तीन विशेष समितीच्या अध्यक्षपदांची निवडणूक सोमवारी पार पडली. आरोग्य समिती अध्यक्षपदी अभासेच्या गीता गवळी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्षपदी भाजपाचे महेश पारकर अपेक्षेप्रमाणे विजयी झाले.

आरोग्य समिती अध्यक्षपदी सत्ताधारी युतीकडून यंदा अभासेच्या गीता गवळी यांना उमेदवारी देण्यात आली होती. गवळी यांच्यासमोर काँग्रेसने परमिंदर अमरा यांना उभे केले होते. मात्र संख्याबळाच्या जोरावर गवळी यांनी अमरा यांचा पराभव केला. यामुळे सलग दुसर्‍यांदा गवळी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसच्या शांतीलाल दोषी यांचा पराभव केला, तर स्थापत्य समिती (उपनगरे)च्या लढतीत भाजपाचे नगरसेवक महेश पारकर बिनविरोध निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार महेश नंदकुमार वैती यांचा अर्ज बाद झाला. या तिन्ही निवडणुकीत मनसेचे सदस्य गैरहजर होते, तर सपाच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, मंगळवारी विधी समिती, बाजार व उद्यान समिती आणि महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. या तिन्ही समित्यांवर युतीचा विजय जवळपास निश्‍चित आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages