बेस्टमध्ये १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी नियम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टमध्ये १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी नियम

Share This
मुंबई : धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या १२ वर्षांखालील मुला-मुलींना बेस्टमध्ये प्रवासादरम्यान जन्मतारखेबाबत पुरावा जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे उपक्रमाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे. याअगोदरच बेस्टमध्ये मोबाइलवर बोलण्यास उपक्रमाने बंदी घातली आहे. त्यानंतर आणखी एक नियम उपक्रमाने आणला आहे.

काही बालकांची शरीरयष्टी धिप्पाड असल्याने वय चोरून प्रवास करत असल्याची शंका काही चालकांनी गेल्या काळात व्यक्त केली आहे.धिप्पाड शरीरयष्टी असल्याने बसवाहक त्यांना पूर्ण तिकीट घेण्याचा आग्रह धरतात. मात्र त्यास पालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यावर उपाय म्हणून १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या परंतु जास्त वय असल्याची शंका येण्यापर्यंत धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या मुलामुलींना हा नियम लागू करण्यात आला आहे. याअन्वये प्रवासादरम्यान जन्मतारखेबाबत पुराव्याची प्रत किंवा १२ वर्षांखालील बालकांचे वय प्रमाणित करणारे उपक्रमातर्फे दिले जाणारे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे बेस्टने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages