मोबाइलच्या निष्क्रिय स्क्रीनवरही जाहिराती झळकणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोबाइलच्या निष्क्रिय स्क्रीनवरही जाहिराती झळकणार

Share This

मुंबई : मोबाइल ग्राहकांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या आणि मोबाइलमधील वाढत्या आधुनिकतेकडे पाहता जागतिक पातळीवरील बड्या कंपन्यांच्या नजरा भारतीय बाजारपेठेकडे वळल्या आहेत. बाजारात येणारे नवनवे मोबाइल आणि त्यामधील सुविधांकडे ग्राहक अधिक आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मोबाइलवरील निष्क्रिय स्क्रीनचा वापर जाहिरातीसाठी करण्याची अनोखी सुविधा उपलब्ध झाली आहे. 

जागतिक दूरसंचार संशोधन संघटना असलेल्या बर्ग इनसाइटनुसार मोबाइल जाहिरातींकरिता असलेली जागतिक बाजारपेठ २0१0 मधील ३.४ दशलक्ष डॉलर इतकी होती. यामध्ये दरवर्षी यामध्ये ३७ टक्क्यांनी वाढ होत २0१६ सालापर्यंत हा आकडा २२ दशलक्ष डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जाहिरातींमध्ये ३.८ टक्के ते १५.२ टक्के एवढा मोबाइल विपणनाचा भाग वाढण्याची संभावना आहे. त्यामुळे मोबाइलवरील प्रत्येक अँप्सवर हल्ली जाहिरातींचा प्रभाव दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर इंटरनेट कनेक्शन सुरू असताना मोबाइलवर गेम्स खेळतानादेखील जाहिरातींचा मारा कायम असतो. त्यामुळे युरेका मोबाइल एडव्हर्टायजिंगने मोबाईलचा वापर नसताना त्यावरील निष्क्रिय स्क्रीनवर चक्क जाहिराती झळकवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. युरेका सध्या अँण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून लवकरच ब्लॅकबेरी आणि सिम्बियन तसेच इतर दूरसंचार चालकांदरम्यान उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages