चिमुकलीचे प्राण वाचवणार्‍या निखिलचा सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चिमुकलीचे प्राण वाचवणार्‍या निखिलचा सत्कार

Share This

मुंबई : पाय घसरून ग्रिलमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अनया रेळे या चिमुकलीचा आपला जीव धोक्यात घालून प्राण वाचवणार्‍या निखिल उगले या युवकाचा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी ९ एप्रिल २0१३ रोजी पालिका बोधचिन्ह, प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसारमाध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलताना महापौर म्हणाले की, निखिल उगलेने धाडस दाखवून चार वर्षीय अनयाचे वाचवलेले प्राण ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब असून या युवकाला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पदक मिळून त्याच्या कतृत्वाचा गौरव व्हावा यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याचे महापौर या वेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages