राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

Share This

मुंबई : सन २000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षणव द्यावे, एसआरए योजना, म्हाडाच्या इमारतींचा प्रश्न,बीडीडी चाळीचा प्रश्न, धारावी, संक्रमण शिबिरे आदी प्रश्न घेऊन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला.म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या इमारती, झोपड्यात राहाणार्‍या जनतेचे भयावह प्रश्न, त्यांचे संरक्षण, संक्रमण शिबिरातील मूळ भाडेकरूंकडून विकत घेतलेल्या रहिवाशांचे नियमितीकरण थांबले आहे. उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांची पात्रता निश्‍चित करण्याबाबत शासन निर्णयात सुधारणा कराव्यात, समुद्रकिनार्‍यालगतच्या जुन्या इमारती आणि सीआरझेडचा त्वरित निर्णय घ्यावा, आदी मागण्या घेऊन पाटील यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages