मधुमेहींची माहिती ठेवणारे सॉफ्टवेअर विकसित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मधुमेहींची माहिती ठेवणारे सॉफ्टवेअर विकसित

Share This
मुंबई : ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जागतिक आरोग्य दिनाचा उच्च रक्तदाब नियंत्रण हा उद्देश साधत कंट्रोल डायबिटिस अँण्ड हायपरटेंशन अँण्ड नाऊ या अभियानांतर्गत पालिकेतर्फे जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर मधुमेही रुग्णांचे जीवनमान सर्वसामान्यांसारखे अतिशय सोपे करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला अशाप्रकारे कार्यप्रणाली विकसित करणारी भारतातील पहिली पालिका असल्याचा मान मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी महापौरांच्या हस्ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबाविषयी पुस्तिका, मधुमेहासंबंधी फिल्म आणि डायबिटीस डेटा बेसचे विमोचन करण्यात आले.

विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दवाखाने, रुग्णालये येथील सर्व रुग्णांची माहिती भरण्यात येईल. पालिकेच्या २४ विभागांत वस्ती पातळीवर ६२ लाख ४३ हजार २0१ लोकांचे सर्वेक्षण करून मधुमेहाची लक्षणे आढळलेल्या ८ हजार ६१५ इतक्या लोकांची रक्ततपासणी करण्यात आली. दरम्यान, समाजात वाढत असलेल्या असंसर्गजन्य रोग जसे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी पालिकेने पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये या आजारांची मूलभूत माहिती तसेच त्याचे सोपे प्रतिबंधक उपाय सुचवण्यात आले आहेत. या पुस्तकात जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी, व्यायाम आणि तणावमुक्ती याबाबत आपल्या जीवनात बदल करण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. दरम्यान, तंत्रज्ञानामध्ये झालेल्या आधुनिक बदलाच्या सहाय्याने आजीवन असलेल्या असंसर्गजन्य रोगांच्या रुग्णांची माहिती आयुष्यभर ठेवण्यासाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांची सर्व माहिती संकलित राहावी यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.
मुख्य उद्देशविशेष आरोग्य शिबिरे
एकूण १६ मधुमेह विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डोळ्य़ांचे,मधुमेहाचे, हृदय शल्य चिकित्सक डॉक्टरांचे आणि आहारतज्ज्ञ या सर्वांचे विशेष मार्गदर्शन रुग्णांना दिले जाणार आहे. यामध्ये सहा हजार लाभार्थींची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ५५ रुग्णालयांत मधुमेह विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागामार्फत एकूण ८ हजार ५00 रुग्णांना औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात आले आहे. 
मधुमेह रुग्णांची यादी आणि दूरध्वनी तसेच आजारासंबंधी माहिती संकलित करणे
या माहितीच्या आधारे रुग्णांचा वेळोवेळी अहवाल प्राप्त करणे
सर्व रुग्णांना महिन्यातून एकदा आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल दूरध्वनी संदेशाद्वारे जागरूक करणे.रुग्णांना दूरध्वनी संदेशाद्वारे औषधे घेण्यासाठी स्मरण करून देणेरुग्णांच्या पत्त्यावरून अनियमित रुग्णांचा पाठपुरावा करणे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages