संजय, अफझल गुरू एकसारखेच - उमा भारती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संजय, अफझल गुरू एकसारखेच - उमा भारती

Share This
भाजपाच्या नवनियुक्त उपाध्यक्षा उमा भारतींनी तर संजय दत्त आणि अफझल गुरू एकसारखेच गुन्हेगार असून त्याची शिक्षा माफीलायक नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी 'मिशन २0१४'साठी पक्षाच्या उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड केल्यानंतर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. या वेळी बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या माफीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी संजूबाबाची तुलना थेट संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूशी केली. संजय दत्त आणि अफझल गुरू हे दोघेही गुन्हा घडताना घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे सिद्ध झालेले आहे. 

त्यामुळे या दोघांचाही गुन्हा एकसारखाच असून संजयला अजिबात माफी देण्यात येऊ नये, असे उमा भारती म्हणाल्या. ९३च्या बॉम्बस्फोटानंतरही संजयचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झालेले असतानाही त्याच्या माफीची शिफारस करणारी मंडळी मतांसाठी गलिच्छ राजकारण करत आहेत. संजय दत्त एक गुन्हेगार, देशद्रोही असून त्याची शिक्षा माफ करण्यात येऊ नये. तसेच त्याला माफ करण्याची मागणी करणार्‍यांनाही देश कधी माफ करणार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
माफीनामा राज्यपालांकडून गृहमंत्रालयाकडे
मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला माफ करण्यासाठी देण्यात आलेल्या माफीनाम्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कार्यवाही सुरू केली आहे. राज्यपालांच्या सचिवांनी हा माफीनामा पुढील निर्णयासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे पाठवला असल्याचे सोमवारी राजभवन प्रवक्त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages