महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना इंदापूर येथील जाहिर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून दुष्काळग्रस्त जनतेची क्रूर चेष्टा केली होती,आणि त्या घटनेची प्रायश्चित म्हणून आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अजित पवार यांनी भेट देऊन समाधीसमोर नतमस्क होऊन आत्मक्लेश उपोषण धारण करण्याचे नौटंकी करीत आहे अशा ड्रामेबाज अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केली .
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित रामदास आठवले यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले तसेच भारतातील तमाम नागरिकांना जयंतीच्या हार्दिक सुभेच्या दिल्या, यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि अजित पवारांची आजची कृती म्हणजे ५० टक्के नाटक आणि ५० टक्के आत्मक्लेश आहे,टगे लोक माफी मागत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. अजित पवारांना प्रायश्चित करायची असेल तर त्यांनी आपल्या पदाच्या राजीनामा देऊन करावा,पण महाराष्ट्रातील जनतेच्या भावनाशी खेळू नका राजीनामाच दिला पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment