चार काँग्रेस नगरसेवकांना पक्षाकडून 'कारणे दाखवा' नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चार काँग्रेस नगरसेवकांना पक्षाकडून 'कारणे दाखवा' नोटीस

Share This
मुंबई : मुंबई महानगर प्रभाग समिती निवडणुकीत मतदान अवैध ठरलेल्या तसेच पक्षाचे आदेश न मानणार्‍या चार काँग्रेस नगरसेवकांना पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. यापैकी एम-पूर्व प्रभागात काँग्रेस नगरसेविका उषा कांबळे यांचे मत अवैध ठरल्याने सेना सर्मथक भारिपचे उमेदवार अरुण कांबळे यांना विजयाची संधी मिळाली. तर 'डी' प्रभागात काँग्रेस उमेदवार शांतीलाल दोषी यांनी स्वत:चेच मत शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांना दिल्यामुळे त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. 

काँग्रेसकडून आर- मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले असतानाही त्यांनी अर्ज न भरल्याने भाजपाच्या उमेदवार मनीषा चौधरी बिनविरोध निवडून आल्यामुळे शेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली, तर काँग्रेसचे नगरसेवक फैयाज अहमद यांनी विधी समितीत अवैध मतदान केल्यामुळे त्यांनाही काँग्रेस नेते ज्ञानराज निकम यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages