पालिकेच्या मालमत्तांची ब्रिटिश नावे बदलावीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2013

पालिकेच्या मालमत्तांची ब्रिटिश नावे बदलावीत


मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य काळातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची स्मृती भारतीय नागरिकांच्या मनामध्ये चिरंतन टिकून राहावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मालमत्तांची ब्रिटिश नावे बदलावीत. या मालमत्तांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्यावीत त्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील पालिकेच्या मालकीच्या अनेक मालमत्तांपैकी काही मालमत्ता या ब्रिटिशकालीन असून त्या मालमत्तांना ब्रिटिश व्यक्तींची नावे आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून बराच कालावधी लोटलेला असतानाही अद्यापही नावे बदलण्यात आलेली नाहीत. भारतीय स्वातंत्र्य लढय़ात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हालअपेष्ठा सहन केल्या. कारावास भोगला, अनेकांनी बलिदान दिले. त्यांची स्मृती टिकून राहावी, यासाठी पालिकेच्या अखत्यारीतील मालमत्तांना जी ब्रिटिश नावे आहेत ती बदलून त्याजागी स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याचे धोरण आखण्यात यावे, अशी मागणी सईदा खान यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad