नवी दिल्ली : भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या 'पूर्ती' उद्योग समूहाने तब्बल ७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याची माहिती प्राप्तीकर खात्याने दिली आहे. गेल्या दोन वर्षांमधील व्यवहारांच्या चौकशीदरम्यान कंपनीची ही करचोरी उघडकीस आल्याचे प्राप्तीकर खात्याच्या उच्च पदस्थ अधिकार्यांनी सांगितले.
पूर्ती उद्योग समूहातील अनेक बनावट व्यवहारांमुळे भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना फार मोठी किंमत मोजावी लागली होती. दुसर्यांदा अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडणार तेव्हाच 'पूर्ती'वर आयकर छापे पडले आणि गडकरींच्या अडचणींत भर पडली. अध्यक्षपद गेल्यानंतर आता पुन्हा एकदा गडकरींच्या नावावर आणखी एक डाग लागला आहे. आयकर विभाग 'पूर्ती पॉवर अँँड शुगर लिमिटेड' कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असून, या कंपनीची करचोरी उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीने तब्बल ७ कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे आयकर अधिकार्यांचे म्हणणे आहे. प्राप्तीकर खात्याकडून अंतिम अहवाल या वर्षाच्या अखेरपर्यंत सादर करण्यात येईल.
दरम्यान, यासंदर्भात पूर्ती समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी नितीन कुळकर्णी यांनी सांगितले की, आम्हाला अजून कायदेशीर नोटीस मिळालेली नसून, नोटीस मिळाल्याने काही चुकीचे केले आहे, हे सिद्ध होत नाही. नोटीस पाठविण्याची नियमित प्रक्रिया असते. त्यावर उत्तर देऊन अनेक पातळींवर अपील करण्याची मुभा आहे, तसेच पूर्ती समूहाची सुरुवात गडकरी यांनी केली असली, तरी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा या समूहाशी काहीही संबंध नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment