उद्धव ठाकरे यांना गोर्‍हेंचा टेकू लागतो - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उद्धव ठाकरे यांना गोर्‍हेंचा टेकू लागतो

Share This
मुंबई : शिवसेना आता मर्दांची संघटना राहिली नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाताला नीलम गोर्‍हेंचा टेकू लागतो, अशी टीका राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी गुरुवारी केली. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना वासरू संबोधत त्यांनी आदित्य यांची नक्कलही केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर शिर्के, युवा सेनेचे तालुकाप्रमुख संदीप मांडवकर, दिनेश पवार, गणेश पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे अशोक डाफले, गंगाराम डाफले आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी या कार्यकर्त्यांसमोर बोलताना भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरे यांची टिंगल केली. युवा सेनेचे अध्यक्ष काय, काय त्यांचे नाव? ते वासरू हा आदित्य! परवा क्रिकेटचा सामना पाहायला गेला. तेथून बारीक बारीक असा आवाज कानी पडला. कोण बोलते आहे हे विचारले तर आदित्य! ज्यांच्या आवाजातच दम नाही ते संघटना काय चालविणार? असे ते आदित्य यांच्या आवाजाची नक्कल करत म्हणाले.

उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले की त्यांचा हातच उचलत नाही. हात उचलायलाही त्यांना नीलम गोर्‍हेंचा टेकू घ्यावा लागतो. एकेकाळी र्मदांची संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघटनेकडे विकासाकडे नेणारे नेतृत्व नाही. राष्ट्रवादीकडे आहे. येथे लोकशाही आहे. आपण या पक्षात आलात, हे योग्यच झाले, असेही जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांच्या भाषणाचा सारा सूर अत्यंत आक्रमक असल्याने येत्या काही दिवसात शिवसेनेकडून त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकार्‍यावर म्हणजेच भास्कर जाधव यांच्यावर टीकेचा भडिमार होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages