हेल्पलाइन क्र.२४१३१२१२
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य निरोगी असणे, ही महत्त्वाची बाब आहे. मानसिक आरोग्यविषयक तक्रारींसाठी मनुष्य स्वत:हून डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच मानसिक रुग्णांविषयी समाजाची असलेली अनास्था ही रुग्णांना उपचार करण्यापासून परावृत्त करते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने मानसिक आरोग्य हेल्पलाइन 'हितगुज' सुरू केली आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते बुधवारी या हेल्पलाइनचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मनपाच्या सर्व २४ विभागांमधील मानसिक आरोग्यविषयक दवाखान्यांचे ही लोकार्पण करण्यात आले.
महापालिकेतर्फे मुंबईकरांना देण्यात येणार्या आरोग्यविषयक सेवा आणि सुविधांचे विश्लेषण करताना मानसिक आरोग्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे आढळून आले. त्यानुसारच हितगुज या मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याचे महापौर प्रभु यांनी सांगितले.मानसिक आरोग्यविषयक किंवा ताणतणाव विषयक समुपदशेनाची गरज आणार्यांनी २४ तास सुरू असणार्या या क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात. तसेच
समुपदशेनादरम्यान एखाद्या व्यक्तीस तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज निर्माण झाल्याचे त्या व्यक्तिरित मनपाच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर) मनीषा म्हैसकर यांनी दिली.

No comments:
Post a Comment