दलित गरीबांच्या विरोधातले आघाडी सरकार - बनसोडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित गरीबांच्या विरोधातले आघाडी सरकार - बनसोडे

Share This

मुंबई : देशावर राज्य करणार्‍या रालोआपेक्षाही राज्यातील आघाडी सरकार दलित आणि गरीबांच्या विरोधातील आहे, असा घणाघाती आरोप रिपाइंचे नेते प्रकाश बनसोडे यांनी केला आहे. २६ मे रोजी कुर्ला येथे होणार्‍या रिपाइंच्या संकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कांदिवली येथे बोलत होते.

रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंची ताकद मुंबईत बरीच मोठी असतानाही निवडणुकांमध्ये रिपाइंला घवघवीत यश मिळताना दिसत नाही. मित्र पक्षांबरोबरच स्वकियांची फितुरी याला कारणीभूत असल्याचा आरोप रिपाइं नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कांदिवली, लालजीपाडा येथे मुख्य कार्यकर्त्यांना संकल्प मेळावा यशस्वी करण्याबाबत सूचना करताना राज्यातील पक्षीय बलांबल आणि रिपाइं याबाबत ते बोलत होते. रिपाइंने काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केली त्या वेळी त्यांना पूर्ण ताकदीने साथ दिली आहे. मात्र त्यांनी फक्त रिपाइंचा वापर करून घेण्यात धन्यता माणली. आता आठवलेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुतीत रिपाइं सामील असून यंदाचे चित्र वेगळे असेल, असा दावा बनसोडे यांनी केला आहे. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, दुष्काळाचे निवारण करण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला खाली खेचण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी २६ मेच्या कुर्ला, नेहरूनगर येथील संकल्प मेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं जनतेला त्यांनी केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages