शनिवारपासून दूध दरवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शनिवारपासून दूध दरवाढ

Share This

मुंबई : राज्यात गायी-म्हशीच्या दुधात अनुक्रमे दोन व तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ २५ मेपासून लागू होणार आहे. दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दरवाढीची घोषणा केली. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे पशुखाद्य व चारा महाग झाले आहे. मजुरी खर्चही वाढला आहे. त्यामुळे दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गायीला प्रतिलिटर २८ रुपये, तर म्हशीला प्रतिलिटर ४0 रुपये उत्पादन खर्च येतो. त्यामुळे दुग्धव्यवसाय हा तोट्यातच सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्यामुळे खरेदी दर १७ वरून १८.५0 रु. एवढा झाला आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर अडीच रुपयांनी वाढ केली असून, हा दर २५ वरून २७.५0 रु. इतका झाला आहे. शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणार्‍या गायीच्या दूध दरात २ रुपयांनी वाढ केली असून, म्हशीच्या दूध दरात ३ रुपयांनी वाढ केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages