प्राध्यापकांचा बहिष्कार मागे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्राध्यापकांचा बहिष्कार मागे

Share This

नेट-सेटचा तिढा कायम
मुंबई : तातडीने बहिष्कार मागे घेऊन पदवी परीक्षांचे कामकाज सुरू करा आणि परीक्षांचे निकाल वेळेवर लावा, असे हायकोर्टाने बजावताच शनिवारपासून पदवी परीक्षांच्या कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे एमफुक्टोने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नेट-सेटचा तिढा अद्यापि कायम असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही एमफुक्टोने म्हटले आहे.

हायकोर्टाने सांगितले तर तातडीने बहिष्कार मागे घेऊ, असे एमफुक्टोने आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, नेट-सेटप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात जाणार, असेही एमफुक्टोने स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे अखेर प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टाने प्राध्यापकांना फटकारतानाच राज्य सरकारनेही १५ दिवसांत आपली भूमिका अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने १५00 कोटी रुपयांची थकीत रक्कम त्वरित द्यावी आणि १९९६ पर्यंतच्या प्राध्यापकांसाठी नेट-सेटची अट शिथील करावी, अशी प्राध्यापक संघटनांची मागणी आहे. यातील थकीत रकमेचा परतावा करण्याची तयारी सरकारने दाखवली असून त्यासाठी राज्य सरकारने ५00 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. दरम्यान, नेट-सेटचा तिढा अद्यापि कायम असून याबाबत राज्य सरकारची भूमिका ताठर आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages