उपोषणार्थी स्वातंत्र्यसैनिकांची बोळवण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपोषणार्थी स्वातंत्र्यसैनिकांची बोळवण

Share This

मुंबई - सातारा जिल्ह्यातील 27 स्वातंत्र्यसैनिकांचा पेन्शनसाठी 32 वर्षे संघर्ष सुरू आहे. सरकार कारभाराला वैतागून नव्वदी पार केलेल्या या स्वातंत्र्यसैनिकांनी सोमवारी मुंबई गाठली व आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. चार दिवसांनंतर त्यांना मंत्रालयातले बोलावणे आले, परंतु त्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी न लावता कक्ष अधिकार्‍याने या स्वातंत्र्यसैनिकांची थातूरमातूर उत्तरावर बोळवण केली.


कºहाड तालुक्यातील 27 स्वातंत्र्यसैनिक सोमवारपासून आझाद मैदानावर उपोषण करत होते. त्यांनी पेन्शनची सर्व कागदपत्रे 1981 मध्ये शासनाकडे पाठवली आहेत. मात्र, अद्याप त्यांना पेन्शन मंजूर झालेली नाही. ‘आमची शिफारस केलेले स्वातंत्र्यसैनिक आता हयात नाहीत. त्यामुळे 1992 च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही पेन्शनसाठी पात्र आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र, शासन त्यांची दखल घ्यायला तयार नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनप्रकरणी लवकरच एक समिती स्थापन होणार आहे. ती समिती गठित झाल्यानंतर प्राधान्याने तुमची प्रकरणे निकालात काढू. असे त्यांना आश्वासन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages