मोबाइल चार्जिंग फक्त २० सेकंदात! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोबाइल चार्जिंग फक्त २० सेकंदात!

Share This

मोबाइल फोन जास्त वापर करणाऱ्यांसाठी किंवा सतत फिरतीवर असलेल्यांसाठी खूषखबर असून केवळ २० ते ३० सेकंदात मोबाइल पूर्णपणे चार्ज करू शकेल, अशा सुपर-कॅपॅसिटर उपकरणाचा शोध एका १८ वर्षीय भारतीय-अमेरिकन मुलीने लावला आहे. कॉलिफोर्नियात राहणा - या ईशा खरे हिने ही कामगिरी केली असून त्यासाठी तिला इंटेल फाऊंडेशनच्या ' यंग सायंटिस्ट अॅवॉर्ड ' ने गौरवण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल ईशाला इंटेलकडून ५० हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले आहे. त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी ' गूगल ' नेही तिच्या या क्रांतिकारी संशोधनाची दखल घेतली आहे. ईशाच्या या उपकरणाचे आयुष्य १० हजार चार्ज-रिचार्ज सायकलएवढे आहे. मोबाइलच्या सामान्य बॅटरीचे आयुष्य एक हजार सायकल्स असते. त्यामुळे ईशाने बनवलेले उपकरण मोबाइल चार्जिंगसाठी फारच क्रांतिकारी ठरणार आहे.

ईशाच्या या सुपर-कॅपॅसिटरची चाचणी सध्या फक्त एलईडी दिव्यांवरच करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही हे उपकरण वापरता येणार आहे. ' हा सुपर-कॅपॅसिटर लवचिक असल्याने कपड्यांमध्ये क‌िंवा गुंडाळता येणाऱ्या डिस्प्लेमध्येही त्याचा वापर करता येऊ शकेल. बॅटरीच्या तुलनेत त्याचे अनेक वापर आणि उपयोग आहेत, ' असे ईशाने सांगितले. ईशाच्या संशोधनाचा कारच्या बॅटरीमध्येही वापर करता येऊ शकतो, असे इंटेलचेही म्हणणे आहे.

सुपर-कॅपॅसिटर कसा आहे ? 

अत्यंत लहान आकाराचा हा सुपर-कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज डिव्हाइस असून तो मोबाइलच्या बॅटरीमध्ये बसवता येतो. अत्यंत कमी जागेत भरपूर ऊर्जा साठवून ठेवण्याची, चटकन चार्ज करण्याची क्षमता ही या सुपर-कॅपॅसिटरची वैशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages