जकात सुरू ठेवण्यासाठी मोर्चा - शरद राव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जकात सुरू ठेवण्यासाठी मोर्चा - शरद राव

Share This
मुंबई : जकात काढून टाकणे आणि स्थानिक संस्था कर लावणे हे दुसरे तिसरे काही नसून उद्योजक व उत्पादकांवरचा संपूर्ण बोजा काढून घेऊन तो व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य जनतेवर लादण्याचा प्रकार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ १ जूनपासून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच १२ जून रोजी भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान, असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी सांगितले.

पालिकेचे जकातीपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न ७५00 कोटी आहे, तर एलबीटीपासून जमा होणारे उत्पन्न ३000 कोटींचा टप्पाही गाठू शकणार नसल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मनपाला जकातीऐवजी जमा होणार्‍या महसुलापोटी चार हजार ५00 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. नुकसान टाळण्यासाठी मालमत्ता कर, पाणी कर यामध्ये वाढ करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. नागरी सेवांच्या रक्षणासाठी, सर्वसामान्य नागरिकांवर करांचा कोणताही आर्थिक बोजा वाढवू नये यासाठी आणि जकातीएवढा महसूल गोळा होईल, असा पर्याय मिळेपर्यंत जकात सुरू ठेवण्यासाठी १२ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच नागरी सेवांच्या रक्षणासाठी व कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी १८, १९, २0 जून रोजी मुंबईत प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असे राव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages