बुद्धपौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांच्या विविध रूपांचे दर्शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बुद्धपौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांच्या विविध रूपांचे दर्शन

Share This
मुंबई — गौतम बुद्ध हे शांतता व अंहिसेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. त्यांचे तत्त्वज्ञान हे सहज सोपे असले तरी आत्मसात करणे तितकेच कठीण आहे व हेच तत्त्वज्ञान समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी देशभरातील कलाकार एकत्रित आले आहेत. चित्रस्वरूपात गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. गौतम बुद्धांची साकारण्यात विविध रूपे पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे. १८ ते २५ मेपर्यंत म्हणजे बुद्ध पौर्णिमेपर्यंत हे कलाप्रदर्शन खार येथील सद्गुरू कलादालनात सुरू राहणार आहे. 

चांगले विचार नेहमीच मनाला प्रसन्न करत असतात व गौतम बुद्धांच्या जीवनावरील चित्रकृतीतून सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. देशभरातील विविध भागांतून एका व्यासपीठावर अनय, गोपाळ मनजी, के प्रकाश, मुकेश मंडाल, पी कश्यप, ओम प्रकाश, पारस परमार, प्रशांत नाईक, संजीव नाईक आदी कलाकार एकत्रित आले आहेत. त्यांच्या प्रत्येकाची एक वेगळी लकब आहे ज्यात बुद्धांच्या विविध छब्या रंगछटांनी कॅन्व्हासवर रेखाटल्या आहेत. कलाकारांच्या कलाकृतीला एक व्यासपीठ व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. भारताच्या  कानाकोपर्‍यात एक टँलेट दडलेला आहे.. अशा टँलेटला आम्ही सद्गुरू आर्टस्च्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. या चित्रकारांची कलाकृती दैनंदिन जीवनात धकाधकीच्या आयुष्यात या चित्ररूपात मनाला शांती देते, असे मत सद्गुरू आर्टस्चे अनमोल बबानी यांनी व्यक्त केले. १८ ते २५ मे २०१३ रोजी सकाळी ११ ते ७ यावेळेत सद्गुरू आर्टस्, खार लिंक रोड, खार (प.) येथे सर्वांसाठी खुले असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages