डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहणीय डायरीचे प्रकाशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहणीय डायरीचे प्रकाशन

Share This
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहणीय डायरीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. २0१३ ते २0१६ या तीन वर्षांसाठीच्या या डायरीचे लेखन-संकलन माधव गायकवाड यांनी केले असून संग्राह्यस्वरूपाचा बराच मजकूर या डायरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

या डायरीमध्ये भारताचे संविधान प्रास्ताविक, व्यक्तिगत माहिती, डॉ. आंबेडकर यांचा चरितकाल, डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर प्रसंगी दीक्षार्थींना दिलेल्या २२ प्रतिज्ञा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, १0 सद्गुणांचे आचरण, एक विचारधारा, धम्मदीप, इतिहास घडविणारा तरुण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सचित्र मौलिक विचार, आंबेडकरांच्या ओठावर उगवलेला प्रलयंकारी सूर्य (पु.ल. देशपांडे), डॉ. आंबेडकरांचे प्रबंध व ग्रंथसंपदा, आंबेडकरांची दुर्मिळ छायाचित्रे, गाधीजींबद्दल बाबासाहेबांची मते, बाबासाहेबांचे गुरू, बाबासाहेबांच्या स्वक्षस्ताक्षरातील पत्र, जगातील बुद्घधम्माचा इतिहास, पौर्णिमेचे महत्त्व, हे मनुष्यो (भगवान बुद्ध), भारतातील काही लेणी, तथागत गौतम बुद्ध यांचा जीवनपट, बुद्धाची तत्त्वप्रणाली, भगवंतांनी कोणत्या गोष्टी निषिद्ध मानल्या, सुख व प्रगतीसाठी महत्त्वाचा विचार, अष्टांगिक मार्ग, बुद्धवंदना, सरणमयं, पंचसीलानी, पवित्र स्थळे, भीम स्तुती, महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, प्रसंग आणि कामगिरी, सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, छत्रपती शिवाजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा परिचय, आद्यगुरू लहूजी साळवे, राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट, मागासवर्गीयांचे अधिकार, तक्रार कशी करावी, माहितीचा अधिकार, माझा मूलभूत अधिकार आदी असंख्य प्रकारची माहिती या डायरीमध्ये देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९७६९९२९९४२ येथे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages