आयपीएल सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे - दिलीप वेंगसरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयपीएल सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे - दिलीप वेंगसरकर

Share This
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ पसरला असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल राजकीय नेत्यांनी नाराजी दर्शविली असताना भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी धावून आले आहेत. आयपीएल स्पर्धेतील आणखी एका अंतिम सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे, अशी मागणी वेंगसरकरांनी पत्राद्वारे भारतीय क्रिकेट मंडळाला केली आहे. या पत्रात माजी कर्णधाराने सुचवले आहे की, आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी खेळला जाणार आहे. तो सामना कोलकात्यात होणार असल्यामुळे एक दिवसाच्या अंतराने २८ मे रोजी दुसरा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर किंवा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करावा. या सामन्याद्वारे मिळणारे पैसे दुष्काळपीडितांच्या मदतीसाठी उपयोगी पडतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या पत्रात वेंगसरकरांनी म्हटले आहे की, भारताचा आणि मुंबईचा माजी कर्णधार या नात्याने मी हे पत्र लिहीत आहे. महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळाचे चटके नागरिकांना बसत आहेत. यापूर्वी बीसीसीआयने अशा प्रकारच्या प्रसंगी मदतीचा हात पुढे केला आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या पत्राबाबत बीसीसीआय कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages