शुक्रवारी औषध दुकानांचा लाक्षणिक संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2013

शुक्रवारी औषध दुकानांचा लाक्षणिक संप


मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या औषधी धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवार, १0 मे रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. देशभरातील सुमारे ७.५ लाख औषध व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार असल्यामुळे जीवनावश्यक औषधांपासून सामान्य रुग्णांचीदेखील यामुळे मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

ऑल इंडिया केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुमारे पाच हजार औषध व्यापारी एकत्रित होऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात धरणे आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या औषध धोरणामुळे देशातील औषध उद्योगाला उतरती कळा आली आहे. ड्रग्स व कॉस्मेटिक्स एॅक्टमध्ये करण्यात आलेल्या बदलातूनदेखील औषध व्यावसायिकांना सूट देण्याची मागणी केली जात आहे. औषध उद्योग क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) मंजुरी दिल्याने सुमारे २५ लाख परिवार तसेच एक कोटीहून अधिक जनतेवर त्याचा प्रभाव पडणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सर्व राज्यांतील मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री, अर्थमंत्री, रसायन व ऊर्जामंत्री, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडे आम्ही गार्‍हाणे मांडले. परंतु सरकारच्या धोरणात कोणताही बदल न झाल्याने शुक्रवारी लाक्षणिक बंदची हाक दिली आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad