एटीएममधूनही पैसे जमा करता येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एटीएममधूनही पैसे जमा करता येणार

Share This

मुंबई : बँकिंग व्यवहाराला अधिक सुलभता निर्माण व्हावी या हेतूने भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने देशातील एटीएम्समधूनही रक्कम जमा करण्याची सुविधा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसबीआयने ६00 एनसीआर सेल्फ सर्व्ह ३२ इंटेलिजण्ट कॅश डिपॉझिट एटीएम्स तैनात करण्याकरिता एनसीआर कॉर्पोरेशनची निवड केली आहे. कॅश डिपॉझिट एटीएम्सकरिता नोंदवण्यात आलेली ही देशातील एकमेव सर्वात मोठी कंत्राट असल्याचे मानले जात आहे.

एखाद्या सर्वसाधारण शाखेत धनादेश आणि रोख रक्कम काढणे असे ६0 टक्क्यांहून जास्त बँकिंग व्यवहार टेलर काऊंटर्सवर होत आहे. एनसीआर सेल्फ सर्व्ह इंटेलिजण्ट डिपॉझिट एटीएम्समुळे एसबीआयला शाखांमधील लांबलचक रांगांना आळा घालता येणार आहे आणि आपल्या ग्राहकांना बँकेच्या वेळेव्यतिरिक्त एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्याची सुविधा उललब्ध करून देता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages