सेकंडहॅण्ड कारला ३.३२ कोटींची बोली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सेकंडहॅण्ड कारला ३.३२ कोटींची बोली

Share This


लंडन : दुसर्‍या महायुद्धादरम्यान ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी वापरलेल्या कारचा ४.७ लाख युरो म्हणजे ३.३२ कोटी रुपये किमतीला लिलाव झाला. चर्चिल १९४0 ते १९४५ आणि १९५१ ते १९५५ या कालावधीत दोनदा ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांच्या कारची हल्लीच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ईबेवर लिलावात विक्री करण्यात आली. र्जमनीतील एक डिलर फॅवकेने ही कार विक्रीस ठेवली होती. डॅल्मर डीबी १८ या क्रमांक व १९३९ मॉडेलची ही चंदेरी व काळ्य़ा रंगाची कार ऐतिहासिक मानली जाते. खरेतर डॅल्मरने अशा एकूण २३ कार बनविण्याचा निर्णय घेतला होता, पण दुसर्‍या महायुद्धात तोंड फुटल्याने फक्त आठच कार तयार होऊ शकल्या. या आठपैकी चार कार शस्त्रूराष्टांकडून झालेल्या बॉम्बवर्षावात नष्ट झाल्या. त्यातील एकीची तर एवढी हानी झाली होती की, तिला भंगारात विकावे लागले होते. अन्य दोन कारबाबत मात्र सध्या तरी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर डॅल्मरची ही एकमेव कार विन्स्टन चर्चिल यांच्याकडेच शिल्लक होती. या कारच्या लिलावामध्ये सुरुवातीची बोली फक्त एक युरो होती, पण दहा दिवसांत झपाट्याने वाढ होऊन ती तब्बल ४.७ लाख युरोंवर पोहोचली. या कारसाठी बोली लावणार्‍यांमध्ये जगातील प्रत्येक भागातील लोकांनी सहभाग घेतला. या कारच्या बोनेटमध्ये एक स्पीकरही जोडलेला होता. त्याच्या मदतीने चर्चिल लोकांना संबोधित करत असत. कारमधील आसने हिरव्या रंगाची असून ती प्राण्यांच्या चामड्य़ांपासून तयार करण्यात आलेली होती आणि तिचे फोल्डिंग छत चॉकलेटी रंगाचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages