एमआरव्हीसीचा अभ्यास दौर्‍यावर कोट्यवधींचा खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमआरव्हीसीचा अभ्यास दौर्‍यावर कोट्यवधींचा खर्च

Share This

मुंबई : एकीकडे रेल्वे बोर्ड सदस्य लाच प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरशनच्या (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अभ्यास दौर्‍यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. गेल्या १0 वर्षांत १२१ अधिकार्‍यांनी विविध देशांतील नवे प्रकल्प, विकासकामे आणि प्रात्यक्षिक दौर्‍यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च झाले आहेत.मध्य, पश्‍चिम आणि हार्बर रेल्वेतील विकासकामे आणि प्रकल्पांसाठी एमआरव्हीसीची स्थापना करण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर नव्या लोकल्सची खरेदी, नवे तंत्रज्ञान, रेल्वेच्या अखत्यारितील विषयांचा अभ्यास दौर्‍यात समावेश होता. या दौर्‍यांसाठी १0 वर्षांत २ कोटी ९३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक दौर्‍यामागे किमान ३ लाख रुपये खर्च झाले आहेत. रेल्वे बोर्डाने वाढणारा खर्च कमी करण्यासाठी अभ्यास दौरे कमी करावे आणि व्हिडीयो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बैठक घ्यावी, असे परिपत्रक काढले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अभ्यास दौरे काढले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. वर्ष २00६-२00७ अभ्यास दौर्‍यावर सर्वाधिक रक्कम ६0लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. २0११-१२ मध्ये २३ लाख, २00९-१0 मध्ये ४२ लाख, २00८-२00९ मध्ये ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्या उपनगरीय लोकलची निवड, तांत्रिक चाचणी, प्रशिक्षणाची सुविधा या सर्व बाबीवर लक्ष देण्यासाठी आणि त्या जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरे महत्त्वाचे असल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages