आरक्षणाच्या मुद्दय़ावर आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरक्षणाच्या मुद्दय़ावर आंदोलनाचा इशारा

Share This

मुंबई : अल्पसंख्याक समाजाला मिळणार्‍या आरक्षणाबाबत घटनेमध्ये जे लिहिले आहे, त्याबाबत या समाजामध्ये अनेक मतभेद आहेत, त्यामुळे सरकारने घटनेच्या कलम ३४१ मध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावर योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा, अन्यथा अवामी विकास पार्टीच्या वतीने देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष समशेरखान पठाण यांनी सोमवारी पत्रकार संघ येथे दिला.

जो समाज हिंदू धर्माला स्वीकारत नाही, त्या समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. अशा प्रकारचे हे वाक्य त्वरित बदली करण्यात यावे, असे सांगत पठाण म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ मध्ये मागासवर्गीयांना १५ टक्के आरक्षण मिळावे, असे स्पष्ट केले, मात्र १९५0 साली ज्यांनी त्यामध्ये बदल केला, तो अन्याकारक आहे. त्यामुळे या समाजावर आजही अन्याय होत आहे, असे पठाण म्हणाले. या वेळी पार्टीचे खजिनदार इर्शाद खतीब म्हणाले, सरकारने याप्रश्नी गांभीर्याने भूमिका घेऊन या समाजाचे प्रश्न त्वरित मार्गी लावावेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages