सफाई कामगारांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई कामगारांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन

Share This

मुंबई : नरकयाताना भोगत काम करणार्‍या सफाई कामगारांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न कोणताही राजकीय पक्ष करत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे, असे स्पष्ट मत 'पद्मश्री' नामदेव ढसाळ यांनी 'न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात' या सफाई कामगारांच्या जीवनावरील चित्ररूपी पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे लोकवाड्मय गृह, भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती) यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, टाटा ट्रस्टच्या रुक्मिणी दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी बोलताना रमेश हटळकर म्हणाले की, सफाई कामगार जर सकाळी आंघोळ करायला लागला तर त्याची पत्नी म्हणते की, आज कामावर जायचे नाही वाटते. अशी त्याची स्थिती आहे. या सफाई कामगारांचा विचार करणारी जमात कुठे आहे? त्यांच्या नरकयातनांची गोष्ट संपणार कधी? दारू, अंधश्रद्धा, आजारपण यामध्ये हा समाज राजकारणी मंडळींनी गुंतवून टाकलाय. माझ्या तीन मुलांच्या हातात झाडू येऊ देणार नाही, अशी मी शपथ घेतली व तसे करूनही दाखवले, असे ढसाळ म्हणाले. त्या वेळी नामदेव ढसाळ यांनी कामगार नेते शरद राव यांना लफंगा म्हणून संबोधले. हा पंचतारांकित कामगार नेता आहे. शरद राव यांच्या मिजाशीला आपण शरण जातोय, असे ढसाळ म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages