प्रवाशांकडून पावणेसतरा लाखांचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवाशांकडून पावणेसतरा लाखांचा दंड वसूल

Share This

मुंबई : बेस्ट उपक्रमाने गेल्या तीन महिन्यांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून जवळपास १६ लाख ७२ हजार ९६१ एवढी रक्कम दंडापोटी वसूल केली आहे.

बेस्ट उपक्रमाने विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आणि खरेदी केलेल्या तिकिटाच्या अंतरापेक्षा पुढे प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत २७ हजार ४४१ प्रवाशांना विविध कारणांस्तव दंड ठोठावण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांनी प्रवास भाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास त्याला कायद्यान्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २00 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे ठोठावता येऊ शकतात. बेस्ट बसेसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे प्रत्येक प्रवाशाला बंधनकारक आहे. तसेच विनातिकीट प्रवास करणे हा एक सामाजिक गुन्हा आहे. या कारणास्तव प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान अािण चारचौघांमध्ये होणारी मानहानी टाळण्यासाठी तिकीट खरेदी करावे आणि खरेदी केलेल्या तिकिटांवर प्रमाणित असलेले अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages