ईस्टर्न फ्री वेला बाबासाहेबांचे नाव द्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ईस्टर्न फ्री वेला बाबासाहेबांचे नाव द्या

Share This

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी?
मुंबई : पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईकडील प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या पूर्वमुक्त मार्गाला (ईस्टर्न फ्री वे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे यासंबंधीची मागणी केली आहे.

ईस्टर्न फ्री वे प्रकल्पाचे ऑरेंज गेट ते चेंबूर व पुढे पांजरपोळ व त्यानंतर घाटकोपर अशा तीन टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आले. यासाठी अनुक्र मे ७५0 कोटी, २२0 कोटी व २८0 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. अणुशक्ती नगर येथील रहिवासी या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत.यापैकी बहुतांश नागरिक अनुसूचित जाती-जमातीचे आहेत. या रहिवाशांनी प्रकल्पास कोणताही विरोध दर्शवला नाही. त्यांनी आपले सर्वस्व प्रकल्पासाठी दिले आहे. या सर्व कारणास्तव त्यांच्या भावना लक्षात घेता ईस्टर्न फ्री वेला बाबासाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages