२८ जून रोजी गिरणी कामगारांचा मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२८ जून रोजी गिरणी कामगारांचा मोर्चा

Share This
मुंबई : गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याबाबत सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध तसेच तयार घरांचे वाटप १४ ऑगस्टपूर्वी करावे, तसेच १२ गिरण्यांच्या जागेवर घर बांधण्यास तातडीने सुरुवात करावी यासाठी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गिरणी कामगार संघटनांकडून सांगण्यात आले आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीला २८ जून रोजी वर्ष पूर्ण होत असून आतापर्यंत केवळ ३00 घरांचा ताबा देण्यात आला असून १८0 कामगारांचे अर्ज म्हाडाकडून हरवले असल्याचे सांगण्यात आले आहे. गिरणी कामगारांच्या घरांबाबत शासनाच्या या अनुत्सुक धोरणामुळेच २८ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सेन्चुरी मिल कामगार एकता संघ, गिरणी चाळ रहिवासी संघ यांचा समावेश असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages