पंचशील नगरवासीयांचे साखळी उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पंचशील नगरवासीयांचे साखळी उपोषण

Share This


मुंबई : चेंबूर येथील पंचशील नगर झोपु योजना राबवण्यात येत असून ६0 टक्क्यांपेक्षाही अधिक झोपडपट्टीवासीयांनी या योजनेला सहमती दर्शवली आहे. शासकीय यंत्रणांनी हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लक्ष घालावे आणि हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी पंचशीलनगर अंतर्गत येणार्‍या ६ एसआरए गृहनिर्माण संस्थांचे रहिवासी २0 जूनपासून साखळी उपोषण करत आहेत.

सीटीएस क्रमांक २९ पार्ट १८३१ पंचशील नगर, अमर महल, चेंबूर येथे अनेक वर्षांपासून राहत असलेल्या रहिवाशांसाठी शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हक्काची घरे देण्याची विकास योजना अरिहंत रिअँल्टर्स यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. एकूण ६ गृहनिर्माण संस्थांचा ८६0 झोपडीधारकांच्या हा विकास प्रकल्प असून ६00 हून अधिक झोपडीधारकांनी या 

योजनेला सहमती दर्शवून धनादेश स्वीकारून झोपडीचा ताबा विकास कंपनीकडे सोपवला आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा ठिकाणी राहायला गेलेले येथील रहिवासी पंचशीलनगरमध्ये लवकरात लवकर हक्काचे सुंदर घर तत्काळ मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषणाला बसले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages