मतदार ओळखपत्र पत्त्याचा पुरावा म्हणूनही ग्राह्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मतदार ओळखपत्र पत्त्याचा पुरावा म्हणूनही ग्राह्य

Share This
निवडणूक आयोगाची माहिती
नवी दिल्ली : कार्यालयीन किंवा इतर कामकाजासाठी आपले ओळखपत्र सादर करत असताना पत्त्यासाठी वेगळा कुठलाही कागद देण्याची आवश्यकता राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी नवीन मतदार ओळखपत्रांबद्दल सांगताना ही माहिती दिली.

भारतात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाचा योग्य पत्ता नव्याने तपासण्यासाठी त्या-त्या मतदार कक्षातील अधिकारी माहिती गोळा करणार आहेत. ही माहिती गोळा केल्यानंतर मतदारांना नवी ओळखपत्रे दिली जातील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी जाहीर केली. नवीन ओळखपत्र दिल्यानंतर तेच पत्त्याचा पुरावा म्हणून संबोधले जाईल. 'विविध कार्यालयीन आणि शासकीय कामांसाठी मतदार ओळखपत्रावरील पत्ता ग्राह्य धरला जाईल. त्यासाठी इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही,' असेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने १९९३ पासूनच मतदार ओळखपत्र देण्यास सुरुवात केली, तर २00४ मध्ये मतदार यादीतही छायाचित्र लावणे सुरू करण्यात आले. त्यामुळे मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील छायाचित्र यांच्यात केवळ ५ टक्क्यांनी फरक राहिला. तो फरकही दूर करण्यासाठी निवडणूक आयोग महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages