झडपा बंद राहिल्याने पाणी तुंबले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झडपा बंद राहिल्याने पाणी तुंबले

Share This
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता, मात्र महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून पाणी तुंबण्यास जबाबदार असणार्‍या कंत्राटदार आणि पालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. ड्रेनेज लाइनच्या झडपा वेळेवर उघडल्या न गेल्याने पाणी तुंबल्याचे पाहणीच्या वेळी निदर्शनास आले.

महापौरांनी पाणी तुंबण्याच्या कारणांचा या वेळी शोध घेतला असता, पाण्याचा निचरा करणार्‍या ड्रेनेज लाइनच्या झडपा वेळेवर उघडल्या गेल्या नसल्याने पाणी तुंबून राहिल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यासाठी जबाबदार असणार्‍या कंत्राटदार आणि पालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी या वेळी पालिका अधिकार्‍यांना दिल्या. संततधार पावसामुळे पाणी तुंबलेल्या परळ येथील हिंदमाता, मडके बुवा चौक येथील ठिकाणची तसेच ब्रिटानिया आऊटफॉल अंतर्गत काम सुरू असलेल्या लालबाग ते भायखळा दरम्यान कंत्राटदाराने कामात बेपर्वाई केली. त्यामुळे वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानासमोरील ई. एस. पाटणवाला मार्ग, हिरामणी सुपर मार्केट, डॉ. आंबेडकर मार्ग, लालबाग, दत्ताराम लाड मार्ग आणि दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा या ठिकाणी पहिल्यांदाच पाणी साचले होते. या सर्व परिसराची पाहणी मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी दुपारी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages