फेसबुक युझर्सना वाय-फाय फुकटात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेसबुक युझर्सना वाय-फाय फुकटात

Share This
वॉशिंग्टन- फेसबुकचा वापर करणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्हाला वाय-फायची सोय अगदी फुकटात मिळणार आहे. काय म्हणता विश्वास बसत नाही! सोशल नेटवर्किंग वेबसाइटनेच असा प्रस्ताव पुढे आणला असून प्रायोगिक पातळीवर याची सुरुवाती झाली आहे.
छोट्या उद्योगाच्या ठिकाणी ही सेवा देण्याची विचार असून युझर्सना केवळ फेसबुकच्या वापरासाठी वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. एखाद्या कॉफी शॉपमध्ये किंवा अन्य ठिकाणी तुम्ही वाय-फायद्वारे फेसबुकचा वापर करु शकता. यासाठी रूट लिंक फेसबुकद्वारेच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
युझरला फेसबुकचा वापर करायचा असेल तर संबंधित कॉफी शॉपच्या फेसबुक पेजद्वारे तुम्ही फेसबुकवर दाखल होऊ शकता असे वृत्त डिस्कव्हरी न्यूजने दिले आहे. याद्वारे संबंधित उद्योजकाच्या पेजला लाइक्स मिळण्याची शक्यता असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages