पावसाळय़ासाठी बेस्टच्या विद्युत विभागाची तयारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळय़ासाठी बेस्टच्या विद्युत विभागाची तयारी

Share This
मुंबई : मुंबईत पावसाळय़ात विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या तसेच विजेचा झटका बसून अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या समस्यांचा सामना करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रतिबंधनात्मक उपाययोजना राबवण्यासोबतच जागोजागी अतिरिक्त कर्मचार्‍यांची नेमणूकही केली आहे.

बेस्ट उपक्रमाने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रात्रंदिवस तसेच सुट्टीच्या दिवशी व रविवारी कार्यरत असणारे कॉल सेंटर कार्यरत केले आहे. ज्याचा दूरध्वनी क्रमांक २२८४३९३९ आहे. उपक्रमाकडे ९.७ लाख वीजग्राहकांची संगणकीकृत माहिती उपलब्ध असलेले तसेच दक्षिण मुंबईतील कुलाब्यापासून सायन, माहिमपर्यंतचे वीजग्राहक यांची पूर्ण माहिती असलेले हे कॉल सेंटर ८ वितळ तार केंद्रे, ४ बिघाड दुरुस्ती केंद्रे तसेच २ प्रणाली देखरेख यंत्रणेस जोडले गेले आहे. कॉल सेंटरवर तक्रार करताना वीजग्राहकांना फक्त त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीजमापन क्रमांक नोंदवावा लागणार आहे. 

वीजपुरवठा खंडित झाला किंवा इतर तक्रारींसाठी दादर २४१२४२४२, कुलाबा २२१८४२४२, माहिम २४४४४२४२, पाठकवाडी २२0८४२४२, ताडदेव २३0९४२४२, मशीद २३४७४२४२, वरळी २४९५४२४२, सुपारीबाग २४११४२४२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच एकाच इमारतीतील बर्‍याच सदनिकांचा किंवा लगतच्या इमारती किंवा त्याहीपेक्षा मोठय़ा क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाला तर दोष नियंत्रण केंद्रात तक्रार करावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.
दोष नियंत्रण केंद्र
दादर -२४१४६६११,२४१४६६८३
पाठकवाडी- २२0६६६११,२२0६६६६१
माहिम -२४४५६६११,२४४५१0६0
प्रभादेवी -२४३0६६११,२४३२७00७

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages