पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांची गुंडगिरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांची गुंडगिरी

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव (http://jpnnews.webs.com)
मुंबई ते नाशिक प्रवास करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये महिला पासधारकांच्या डब्यामधून पासधारक महिला प्रवाशांकडून गुंडगिरी करून इतर महिला प्रवाशांना त्रास दिला जात असल्याने इतर महिला प्रवाशांना त्रास सहन करून प्रवास कराव लागत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे. 

नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या कित्तेक महिला मुंबई मध्ये काम करण्यासाठी मुंबई ते नाशिक असा प्रवास पंचवटी एक्सप्रेस मधून करत असतात. रेल्वेने अशा महीला प्रवाशांसाठी वेगळी अशी पास बोगी दिली आहे. या महिलांसाठी राखीव असलेल्या पास बोगीवर काही मोजक्याच महिला प्रवाश्यांनी ताबा मिळवला आहे. मुंबई वरून किवा नाशिक वरून प्रवास करताना या महिला पासधारक प्रवाशी संपूर्ण सीटवर ताबा मिळवून अक्षरशा झोपून प्रवास करत आहेत. 

महिला प्रवाशी सीटवरून उठा, सीट बसण्यासाठी आहे झोपण्यासाठी नाही असे बोलल्यास या पासधारक महिला प्रवाशी इतर महिला प्रवाश्यांना धमकी देत असतात, बोगी आमच्या मुळे मिळाली आहे आम्ही झोपूनच जाणार तुम्हाला बसायचे असल्यास एका कोपऱ्यावर  बसा, खिडकी जवळ एक सीट असते या सीटवर बसून प्रवास करा नाहीतर खाली बसून प्रवास करा असे सांगितले जाते. यामुळे काही मोजक्या पासधारक महिला प्रवाशी सीटवर झोपून प्रवास करत असताना इतर महिला प्रवाश्यांना ट्रेनमध्ये खाली बसून प्रवास करावा लागत आहे अशी माहिती रीना गवळे यांनी दिली आहे.

महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार होत असताना ट्रेन मध्ये रेल्वे पोलिस तैनात करण्यात आल्याचे पोलिसांकडे सांगण्यात येत असले तरी पंचवटी एक्सप्रेसच्या महिला पासधारकांच्या बोगीमध्ये कधीही पोलिस किवा तिकीट तपासनीस फिरकतच नसल्याने अशा गुंडगिरी करणाऱ्या महिचे फावले असल्याचे गवळे यांनी सांगितले. मुंबई लोहमार्ग पोलिस व आरपीएफ तसेच तिकीट तपासनीस यांनी  पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या बोगीमध्ये कारवाही करून गुंडगिरी करणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाही करावी अशी मागणी रीना गवळे यांनी केली आहे.    
Photo0607.jpgPhoto0594.jpgPhoto0597.jpgPhoto0599.jpgPhoto0596.jpg

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages