पालिका द्रुतगती मार्गावर १0 शौचालये बांधणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका द्रुतगती मार्गावर १0 शौचालये बांधणार

Share This
मुंबई : मुंबईतून मुंबईबाहेर जाणार्‍या पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून १0 शौचालये बांधण्यात येणार असून, यासाठी एमएमआरडीएकडून परवानगी मिळाली असून, येत्या काही दिवसांत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून परवानगी मिळेल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.

पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावरू न ये-जा करणार्‍या प्रवाशांसाठी या दोन्ही मार्गावर शौचालये नसल्याने फारच कुंचबना होत आहे. यामध्ये सध्या मधुमेहाच्या रुग्णांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, या रुग्णांना सतत लघवी होण्याचे प्रमाण असते, मात्र या दोन्ही महामार्गावर शौचालये नसल्याने मधुमेही पुरुष गाडी थांबवून उघड्यावरच रस्त्याच्या कडेला लघवी करतात. यामुळे रस्त्याच्या परिसरात दुर्गंधी होते. त्याचबरोबर महिला वर्गाला तर कोणताच पर्याय नसल्याने अनेक महिन्यांना किडनीचा विकार जडतो. यासाठी या दोन्ही महामार्गावर शौचालये असणे अत्यंत गरजेचे असल्याने पालिकेतर्फे शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला, मात्र दोन्ही महामार्ग एमएमआरडीएच्या अख्यत्यारित असल्याने तसेच या ठिकाणी बांधकामासाठी सार्वजनिक खात्याची परवानगी घेणे आवश्यक होते. यामध्ये एमएमआरडीएची परवानगी पालिकेला मिळाली असून, थोड्याच दिवसात बांधकाम खात्याची परवानगी मिळून 
येत्या चार-पाच महिन्यांमध्ये शौचालये भारण्यात येतील, असे शेवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages