सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे पालिका उभारणार प्रवेशद्वार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे पालिका उभारणार प्रवेशद्वार

Share This
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पश्‍चिम उपनगरातील दहिसर येथे बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या धर्तीवर मुंबई-पनवेल जकात नाक्याजवळ मानखुर्द येथे प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वारावर एलिफंटा लेण्यामधील त्रिमूर्तीची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने हे प्रवेशद्वार मुंबईत प्रवेश करणार्‍यांना नेत्रसूखही देणारे असणार आहे. हे प्रवेशद्वार २00 फूट लांबीचे असणार असून, मुंबई ही सांस्कृतिक आणि पुरातन वास्तुंची नगरी असल्याने या प्रवेशद्वारावर प्रसिद्ध एलिफंटा येथील धारापुरीचे त्रिमूर्ती शिल्प उभारण्यात येणार असल्याचे या प्रवेशद्वाराचे संकल्पचित्र बनवणार्‍या वास्तूशास्त्रज्ञ विभागाकडून सांगण्यात आले. सध्या या द्रुतगती मार्गावर वाईडिंगचे काम चालू आहे. तसेच या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक वाईडिंगचे काम सुरू असल्याचे वास्तूशास्त्रज्ञ विभागातून घाडगे यांनी सांगितले. प्रवेशद्वाराचे काम १ ऑक्टोबर २0१३ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages