रेल्वेच्या भूखंडावरील पुनर्विकासाबाबत धारावी प्राधिकरणाच्या हालचाली सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 July 2013

रेल्वेच्या भूखंडावरील पुनर्विकासाबाबत धारावी प्राधिकरणाच्या हालचाली सुरू

मुंबई : धारावीतील मध्य रेल्वेच्या अख्त्यारीतील जागा आराखड्यातून वगळल्याने धारावीकरांनी पाठवलेल्या सूचना व हरकतींचा विचार करून धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने रेल्वे प्राधिकरणाकडे भूखंड मागणीसाठी विचारणा केली आहे. त्याचबरोबर धारावीतील रेल्वेच्या जागेवर पुनर्विकास करता येईल की नाही, याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे. 

धारावीतील १ ते ५ या सेक्टरपैकी १ व २ या सेक्टरमध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर अनेक झोपड्या उभारण्यात आल्या आहेत, मात्र धारावी आराखड्यात या भूखंडाला वगळण्यात आल्याने या जागेवरील झोपड्यांच्या पुनर्विकासाबाबत कोणताही निर्णय प्राधिकरणाने घेतलेला नाही. धारावीतील आमदार-खासदारांनी मात्र या झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणानेही याबाबत रेल्वे प्राधिकरणाशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अख्त्यारीत हा भूखंड येत असल्याने परवानगीसाठी खूप वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad