टेलिकॉम 'व्हॅल्यू अॅडेड' सेवांचे नियम कडक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टेलिकॉम 'व्हॅल्यू अॅडेड' सेवांचे नियम कडक

Share This

मोबाइल ग्राहकांना दिल्या जाणा-या मूल्यवर्धित सेवेचे अर्थात व्हॅल्यू अॅडेड सर्विसेस साठीचे ( VAS)नियम टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने ( ट्राय ') आणखी कडक केले आहेत. आता एखादी सेवा सुरू करण्यापूर्वी दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांकडून दोनवेळा संमती घ्यावी लागेल तसेच सेवा बंद करण्याच्या विनंतीवर चार तासात कारवाई करावी लागेल. 


व्हॅल्यू अॅडेड सेवा अॅक्टिवेट झाल्यामुळे विनाकारण भुर्दंड सोसावा लागल्याची तक्रार ग्राहकांकडून सातत्याने होत असते. ट्राय ही या प्रकाराने त्रस्त होती. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांची VAS सुरू करण्यापूर्वी दोनवेळा मंजुरी घ्यावी अशी अट घातली आहे. सध्या मोबाइल फोनसेवा कंपन्यांकडून केवळ एकच वेळा परवानगी घेतली जाते. आता दुस-यांदा परवानगी घेण्यासाठी थर्ड पार्टी ची नेमणूक करावी. ग्राहकाने दुस-यांदा परवानगी दिल्यानंतरच मोबाइल कंपन्यांनी ही सेवा सुरू करावी असे ट्राय ने सांगितले आहे. ग्राहकांची परवानगी घेण्यासाठी 'व्हॉइस कॉल ', ' एसएमएस ', मोबाइल इंटरनेट , ' आयव्हीआरएस ', टेलिकॉलिंग , ' अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विसेस डेटा ' (' युएसएसडी ') किंवा इतर मार्गांचा अवलंब करता येईल. सेवेचा कालावधी वाढविण्यासाठी एखादी व्हॅल्यू अॅडेड सेवा ग्राहकाला बंद करायची असेल तर संपूर्ण प्रक्रिया चार तासात पूर्ण करावी असे आदेश ट्राय ने दिले आहेत. सेवा बंद करण्याची प्रक्रिया कंपन्यांनी वर्तमानपत्रे वेबसाइट आणि एसएमएस च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवावी. आपोआप नूतनीकरण होणा-या सेवांसाठी ग्राहकांना २४ तास आधी व्हॉइस कॉल किंवा एसएमएस च्या माध्यमातून माहिती पुरविण्यात यावी. 

ग्राहकांच्या परवानगीशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने क्रियान्वित ( अॅक्टिवेट ') केलेल्या व्हॅल्यू अॅडेड सर्विसेस साठी ग्राहकांना कुठल्याही कंपनीची मोबाइल सेवा असली तरी १५५२२३ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. चुकीच्या पद्धतीने अॅक्टिवेट केलेल्या सेवेसाठी कापून घेण्यात आलेली रक्कम ग्राहकांना २४ तासांच्या आत परत देण्यात यावी. एक दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी वैध असलेल्या सेवेसाठी ग्राहकांनी २४ तासात तक्रार करावी तसेच एक दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी वैध असलेल्या सेवेसाठी ग्राहकांनी सहा तासात तक्रार नोंदवावी असे ट्राय च्या आदेशात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages