अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी गोल्ड मोहरची जमीन द्यावी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी गोल्ड मोहरची जमीन द्यावी

Share This
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या गोल्ड मोहर मिलमध्ये काम करत होते, त्या मिलची जागा अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी देण्यात यावी, यासाठी गुरुवारी अण्णाभाऊ साठे परिनिर्वाण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दामोदर हॉल परळ येथे एका महासभेचे आयोजन महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केली आहे.या सभेसाठी मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष अँड़ एकनाथ आव्हाड, मपसेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मनीषा थोरात, राष्ट्रीय मातंग महासंघाचे अध्यक्ष सत्यनारायण राजहंस, प्रा. मच्छिंद्र सकटे, लहुजी सेनेचे व्ही. जी. रेड्डी, रणधीर कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी एका परिसंवादाचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages