ठाणे : मध्य रेल्वेच्या ५व्या आणि ६व्या रेल्वे लाइनला अडथळा ठरणार्या कळवा रेल्वे स्थानकाजवळच्या ८८ झोपड्या शुक्रवारी हटवण्यात आल्या. दरम्यान, या झोपडीधारकांना मध्य रेल्वेने नाहूर येथे घरे दिली आहेत.
ठाणे ते डोंबिवली दरम्यान ५व्या आणि ६व्या रेल्वे लाइनचे काम रखडले होते. हे काम कळवा रेल्वे स्थानकालगतच्या इंदिरानगर येथील झोपड्या हटवल्यानंतर मार्गी लागणार होते. तसेच ठाणे पालिकेने २0१२ मध्ये केलेल्या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणात ७0 जणांचे पुनर्वसन नाहूर यथे करण्यात आले. एक महिन्यापूर्वी या नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या; परंतु ८८ कुटुंबांपैकी काही झोपडीधारकांनी झोपड्या तोडण्यास नकार दिला. मात्र नगरसेवक महेश साळवी, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार आनंद परांजपे यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ठाणे-डोंबिवली ५व्या आणि ६व्या रेल्वे रुळांचे काम सुरळीत होणार आहे.

No comments:
Post a Comment