निवासी डॉक्टरांना निवासस्थान आणि सकस आहार मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवासी डॉक्टरांना निवासस्थान आणि सकस आहार मिळणार

Share This
मुंबई : मनपाच्या केईएम, सायन आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील सर्व निवासी डॉक्टरांना आगामी काळात उत्तम स्थितीतील निवासस्थान आणि सकस आहार उपलब्ध होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याबाबतचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत

सायन रुग्णालयातील डॉ. समिधा खंदारे यांचा काही दिवसांपूर्वी क्षयरोगाने मृत्यू झाला. निवासी डॉक्टरांचे अस्वच्छ निवासस्थान आणि निकृष्ट आहारामुळे महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर आणि पालिका अधिकार्‍यांनी सायन रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी स्वत:हून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाची पाहणी केली. डॉक्टरांच्या संघटनेचे पदाधिाकरी विकास दीक्षित आणि इतर निवासी डॉक्टर या वेळी उपस्थित होते. सध्याच्या घडीला सायन रुग्णालयात ५0 निवासस्थाने उपलब्ध आहेत. आणखी ५२ निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू आहे, मात्र ही निवासस्थाने अपुरी पडत असल्याने शेवाळे यांनी आणखी निवासस्थाने उभारण्याचे आदेश दिले आहेत. केईएम रुग्णालयातील वसतिगृहाच्या पुनर्बांधकामानंतर अतिरिक्त कक्ष उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयातील नव्या इमारतीमध्ये १७२ कक्ष उपलब्ध असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाचे योग्यरीत्या परीक्षण करावे, दुरुस्ती, अतिरिक्त पेय आणि जलशुद्धीकरण यंत्रणे आणि सुविधा पुरवण्यात याव्या, असे निर्देश शेवाळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages