टेकड्यांवरील धोकादायक झोपड्यांचे पुनर्वसन करावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टेकड्यांवरील धोकादायक झोपड्यांचे पुनर्वसन करावे

Share This
मुंबई : मुंबईतील विविध विभागांतील डोंगर उतारावरील आणि टेकड्यांवरील धोकादायक स्थितीत असलेल्या झोपड्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. यासंबंधी शेवाळे यांनी राज्यपाल के.शंकरनारायणन यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक स्थितीत असलेल्या झोपड्यांचे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने सर्वेक्षण केले आहे. मुंबईतील २५ विधानसभा मतदारसंघात धोकादायक दरडीची अशी ३२७ ठिकाणे असून यामध्ये २२ हजार ४८४ नागरिक राहत आहेत. संरक्षण भिंतीद्वारे राहणार्‍यांची संख्या १0 हजार ३८१ आहे. तसेच ताबडतोब स्थलांतर करावयाच्या झोपड्यांची संख्या ९ हजार ६५७ आहे. या मुद्दय़ावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्षांपूर्वी बैठक झाली होती. यामध्ये झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या मुद्दय़ावर तज्ज्ञ नगररचनाकाराच्या मदतीने एक महिन्याच्या आत कृती आराखडा तयार करण्यात यावा आणि विकास योग्य जमिनीच्या उपलब्धतेबाबत उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र या बैठकीस २१ महिने उलटले तरी अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. आतापर्यंत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये २६0 नागरिकांनी प्राण गमावले असून तेवढेच नागरिक जखमी झाले आहेत. अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी याबाबत शासनाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी झोपडपट्टीधारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages