मुंबई : राज्यभरातील शिक्षणाधिकार्यांची एकूण १७४ पदे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ५0 टक्के पदे ही सरळसेवेने भरण्याची तरतूद सेवाप्रवेश नियमानुसार करण्यात आली आहे. सरळसेवेच्या पदाकरिता विभागाने सन २0१0 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवले होते; परंतु काही न्यायालयीन प्रकियेमुळे आयोगाला या पदासाठी उमेदवारांची शिफारस करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
शिक्षण विभागाने रिक्त झालेली पदे तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार २४ जानेवारी २0१३ रोजी एकूण ५0 अधिकार्यांचा पदोन्नतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा)मधील सरळसेवेने भरावयाच्या शिक्षणाधिकारी आणि तत्सम संवर्गातील रिक्त असलेल्या पदांवर २४ जानेवारी २0१३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पदोन्नती दिलेल्या सर्व अधिकार्यांच्या पदोन्नत्या या शासन निर्णयाद्वारे संपुष्टात आणून या अधिकार्यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजेच उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम संवर्गात पदावनत करण्यात येत आहे. पदावनत केल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. संबंधित शिक्षणाधिकार्यांनी त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे आणि रुजू झाल्याचा दिनांक शासनाला तसेच शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळवावा, असेही शासनादेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment