राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकर्‍या वाचणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकर्‍या वाचणार

Share This
मुंबई : पटपडताळणीत अतिरिक्त ठरणार्‍या आणि २ मे २0१२ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतरांच्या नियुक्त्यांच्या मान्यता प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्याचे तातडीने आदेश काढावेत, असे निर्देश शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण संचालकांना दिले. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकर्‍या वाचणार आहेत.याप्रकरणी नुकतीच राजेंद्र दर्डा यांच्याबरोबर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत याबाबत चर्चा झाली. चर्चेच्या अनुषंगाने पडपडताळणीचा आणि २ मे २0१२ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मान्यता देण्याचा कोणताही संबंध नसल्याने या मान्यता देण्यास नकार देणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, शिक्षण संचालकांनी ३१ जुलै २0१३ च्या आदेशानुसार २ मे २0१२ पूर्वी नियुक्त झालेल्या आणि नियमानुसार असणार्‍या प्रस्तावांना तातडीने मान्यता द्यावी, असे आदेश दिले असल्याने २ मे २0१२ पूर्वी नियमानुसार नियुक्त झालेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतरांना मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणी आमदार रामनाथ मोते यांनी पाठपुरावा केला. याप्रकरणी शिक्षण सचिव सहारिया यांना वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कार्यकर्त्यांसह सहारिया यांना घेराव घालण्याचा आणि त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages