मुंबई, २२ ऑगस्ट २०१३: http://jpnnews.webs.com ( NE WS website )
पद्मश्री पुरस्कार विजेते भारतातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर मुकेश बत्रा यांच्या 'ग्रीस' मधील छायाचित्रांचे ‘मॅजिक मोमेंट्स्’ प्रदर्शन पिरॅमल आर्ट गॅलरी, एनसीपीए येथे भरले आहे. या प्रदर्शनामध्ये लोकप्रिय ग्रीक द्वीप - मायकोनोस व सॅन्टोरिनो दाखविण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनाची सुरुवात काल २१ ऑगस्ट रोजी झाली. यावेळी अभिनेत्री डॉली बिंद्रा, प्रितिश नंदी, सलोमी रॉय कपूर, डॉ. अक्षय बत्रा आदी मान्यवर तसेच ‘हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’संस्थेचे विद्यार्थी आणि पदाधिकारी उपस्थित होती. या प्रदर्शनातून मिळालेली रक्कम विविध प्रकारच्या विशिष्ट क्षमतेच्या मुलांसाठी चालविण्यात येणा-या ‘हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’ला देणगी म्हणून देण्यात येईल. हे प्रदर्शन३१ ऑगस्ट २०१३ पर्यंत सकाळी ११.३० ते ८.३० या वेळेत पिरॅमल आर्ट गॅलरी, एनसीपीए येथे सुरु आहे.

No comments:
Post a Comment