ठाणे: http://jpnnews.webs.com ( NE WS website )
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘एच.एस.बी अगरबत्ती उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच अगरबत्ती उत्सव असून ‘हेमंत सुगंधी भांडार’ तर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ब्रॅण्डच्या आणि आकाराच्या सुगंधित अगरबत्ती पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी यानिमित्ताने लोकांना मिळणार आहे. १० फुट लांबीची, एक फुट रूंदीची आणि ७५ किलो वजनाची अगरबत्ती हे या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. २४ व २५ ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेला रामनगर स्थित आनंद बालभवन येथे या उत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. कालसुसंगत राहण्यासाठी हेमंत सुगंधी भांडार चे ‘हॅपी सेंटेड बिगिनींग’ म्हणजेच ‘एच.एस.बी’ असे नामकरण करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment